नायरोबी – केनियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मवाई किबाकी यांचे निधन. त्यांचे वय 90 वर्षे होते. केनियाचे अध्यक्ष उहुरु केन्याट्टा यांनी शुक्रवारी किबाकी यांच्या मृत्यूची घोषणा केली. महान केनियन यांचे निधन देशासाठी दु:खद असल्याचे त्यांनी म्हटले.
केनियाट्टा म्हणाले की, केनियाच्या राजकारणात मवाई किबाकी हे एक सज्जन व्यक्ती म्हणून नेहमीच स्मरणात राहतील. देशाच्या विकासाला चालना देणारे ते उत्तम वक्ते होते. किबाकी दोनदा केनियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. 2002 ते 2013 पर्यंत ते देशाचे राष्ट्राध्यक्ष होते.