नवी दिल्ली – दिल्लीतील मोठ्या घोटाळ्याबद्दल आपचे नेते मनीष सिसोदिया यांना अटक झाली. ते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. (Kejriwal should also be arrested in excise policy case, says Congress) केजरीवाल यांनाही अटक व्हावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी सिसोदिया यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना आक्रमक भूमिका मांडली. सिसोदिया यांच्याविषयी सहानुभूती वाटणाऱ्यांनी त्यांना भ्रष्टाचाराबद्दल अटक झाल्याचे ध्यानात घ्यावे, असे त्यांनी म्हटले.
दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. केजरीवाल आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा. केजरीवाल सत्तेत असेपर्यंत योग्य चौकशी होऊ शकणार नाही, असे ते म्हणाले.
Delhi excise policy case : केजरीवालांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपची जोरदार निदर्शने
सिसोदिया यांच्या अटकेचा बहुतांश विरोधी पक्ष निषेध करत आहेत. मात्र, कॉंग्रेसमधून विसंगत प्रतिक्रिया येत आहेत. कॉंग्रेसच्या मोजक्या नेत्यांनी सिसोदिया यांच्यावरील कारवाईला विरोध दर्शवला. मात्र, दिल्ली कॉंग्रेसने आपला घेरण्याची रणनीती अवलंबल्याचे दिसते. त्यातून कॉंग्रेसचे दिल्लीतील नेते आप आणि त्या पक्षाच्या सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवताना दिसत आहेत.