केडगाव -येथील दोन दिवसात तीन जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने केडगावकरांच्या चिंतेत भर पडून दोन दिवसात तीन जणांना करोना झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.
आतापर्यंत केडगाव आणि परिसरातील 13 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. ऐरवी मुख्य बाजारपेठेत आहे. त्यातच भर म्हणजे शुक्रवारी (दि.3) हंडाळवाडी येथे एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गर्दी करणारे आता घरीच राहणे पसंत करीत आहेत.
दुकानदार स्वतःहून दुकाने बंद करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, दौंड तालुक्यात बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.