Merry Christmas – अभिनेत्री कतरिना कैफ आणि साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अशात येत्या ख्रिसमसमध्ये निर्मात्यांनी त्यांच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज केला आहे. श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांच्या मागील ‘बदलापूर’ आणि ‘अंधाधुन’ या चित्रपटांच्या शैलीची झलक पाहायला मिळते. अशात या चित्रपटाची उत्सुकता खूप वाढली आहे.
‘मेरी ख्रिसमस’च्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच एका सुंदर प्रेमकथेची सुरुवात होताना दिसत आहे. मात्र, जसजशी कथा पुढे सरकते तसतशी फसवणूक आणि कपटाची झलक दिसू लागते. हा 2 मिनिटे 20 सेकंदाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, कॅटरिना आणि विजय एकत्र दिसत आहे. यानंतर दोघेही एकत्र नाताळ एन्जॉय करतांना दिसत आहे. प्रेक्षकांना जुन्या काळात घेऊन जाणारी अशी दृश्ये चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
ट्रेलरमध्ये कतरिना आणि विजय सेतुपती यांच्यात रोमँटिक सीन्स पाहायला मिळत आहेत. दोघांची केमिस्ट्री अप्रतिम दिसत आहे. ट्रेलरच्या एका सीनमध्ये कतरिना एका थिएटरमध्ये एका मुलीसोबत चित्रपट बघताना दिसत आहे. पुढच्याच क्षणात विजय त्या दोघांच्या समोरच्या सीटवर बसतो हा चित्रपट 12 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे
श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘मेरी ख्रिसमस’ मध्ये कतरिना आणि विजय व्यतिरिक्त टिनू राज आनंद, संजय कपूर, राधिका आपटे, विनय पाठक, अश्विनी काळसेकर आणि प्रतिमा कानन सारखे स्टार्स देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.