मुंबई – एकीकडे सनी देओलच्या ‘गदर 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. दुसरीकडे, सुपरस्टार सलमान खानचे चाहते त्याच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटाची वाट पाहत आहेत. भाईजानच्या चाहत्यांना खात्री आहे की ‘टायगर 3’ बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडेल.
जेव्हापासून यशराजने शाहरुख खानच्या ‘पठाण’मध्ये टायगरची एन्ट्री दाखवली तेव्हापासून ‘टायगर 3’ चर्चेचा भाग राहिला आहे. दरम्यान, अश्यातच चित्रपटाच्या सेटवरून एक नवीन व्हिडिओ लीक झाला आहे.
सलमान आणि अभिनेत्री कतरिना कैफ स्टारर ‘टायगर 3’वर चाहत्यांची नजर आहे. या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक गोष्टी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागतात. अशा परिस्थितीत ‘टायगर 3’ चा एक व्हिडिओ लीक झाला आहे.
व्हिडिओमध्ये कतरिना बॅकग्राउंड डान्सर्ससोबत गाण्याचे शूटिंग करताना दिसत आहे. हे गाणे पाहून तुम्हाला ‘एक था टायगर’ मधील प्रसिद्ध गाणे माशाल्लाहची आठवण होईल. या नवीन गाण्याचा सेट माशाल्लाह या गाण्याशी मिळतोजुळता असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
मात्र, व्हिडिओमध्ये कतरिनाचा चेहरा पूर्णपणे दिसत नाही. व्हिडिओ लीक होताच, नेटिझन्सनी असा अंदाज लावला की टायगर फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात प्रसिद्ध अरबी गाणे ‘मशल्लाह’ पुन्हा एकदा ऐकू येईल. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. मात्र, तरीही एक व्हिडिओ लीक होत आहे.