अयोध्या – सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते रजनीकांत रविवारी अयोध्येला पोहोचले. जिथे त्यांनी हनुमानगढीमध्ये प्रथम भेट दिली आणि पूजा केली. येथून ते रामललाच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी गेले. त्यांची पत्नीही त्याच्यासोबत आहे.
रजनीकांत यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रविवारी सकाळी त्यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेऊन त्यांना आपला मित्र म्हटले.
रजनीकांत यांच्या आगमनावर रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, रजनीकांत अयोध्येत येत असल्याने आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यात त्यांनाही आपला सहभाग नोंदवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर अभिनेते रजनीकांत म्हणाले की, मी नऊ वर्षांपूर्वी अखिलेश यादव यांना मुंबईतील एका कार्यक्रमात भेटलो, त्या दिवसापासून आम्ही मित्र आहोत.
अखिलेश यादव यांनीही त्यांना भेटल्यावर ट्विट केले आणि म्हटले की, जेव्हा एखादा सुहृद भेटतो, तेव्हा लोक मिठी मारतात. म्हैसूरमध्ये अभियांत्रिकीच्या शिक्षणादरम्यान रजनीकांत यांना पडद्यावर पाहून जो आनंद वाटायचा तो आजही कायम आहे.
आम्ही 9 वर्षांपूर्वी प्रत्यक्ष भेटलो आणि तेव्हापासून आम्ही मित्र आहोत. रजनीकांत यांनी सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.