Katrina Kaif – बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या आगामी ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या कतरिना कैफने एका मुलाखतीदरम्यान विकी कौशलचे कौतुक केले आहे. तिची नॉनस्टॉप बडबड तो कसा ऐकत राहतो हे तिने सांगितले.
वृत्तवहिनीला दिलेल्या खास बातचीतमध्ये कतरिनाने चित्रपटासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही सांगितले. एका चाहत्याने कतरिनाला विचारले की, ती नेहमी इतकी शांत कशी राहते? याला उत्तर देताना कतरिनाने विकी कौशलचे कौतुक केले.
कतरिना म्हणाली,’मी घरी गेल्यावर ४५ मिनिटे सतत बोलत असते. मी एक्साइटेड होऊन किंवा रागाच्या भरात एखाद्या गोष्टीबद्दल पटकन बोलले तर तो कधी कधी म्हणतो की मी खूप वेगाने बोलते म्हणून त्याला काहीच समजत नाहीये, विकी नेहमी म्हणतो, तुझा इंग्रजीचा उच्चार एसेंट आहे आणि मी त्याच्यासोबत सर्वकाही व्यक्त करतो. तो सर्व काही प्रामाणिकपणे ऐकतो.’
नुकतेच विकी आणि कतरिना नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करून परतले होते. या जोडप्याने यावर्षी राजस्थानमध्ये आपले नवीन वर्ष साजरे केले. कतरिना आणि विकी या दोघांनीही त्यांच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
कतरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, सुरुवातीला हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, पण नंतर तो ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. ८ डिसेंबरला हा चित्रपट सिद्धार्थ मल्होत्राच्या योधासोबत रिलीज होणार होता, त्यामुळे तो पुढे ढकलून १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.