मुंबई – अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलच्या लग्नाला फक्त एक दिवस उरला आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील बरवारा येथील 700 वर्षे जुना किल्ला सिक्स सेन्स फोर्ट येथे दोघेही शाही पद्धतीने लग्न करणार आहेत.
लग्नाचे सर्व विधी सुरू झाले आहेत. गडाला अतिशय सुंदररीतीने सजवण्यात आले आहे. बॉलिवूडचे सर्व स्टार्स त्यांच्या लग्नात हजेरी लावताना दिसत आहेत. कतरिना आणि विकीने बॉलिवूडमध्ये जेवढी प्रसिद्धी मिळवली आहे, तेवढीच लोकांची नजर त्यांच्या लग्नावरही आहे.
दरम्यान, कतरिना कमाईच्या बाबतीत विकीच्या तुलनेत खूप पुढे असल्याच्या बातम्याही चर्चेत आहेत. कतरिना आणि विकीच्या नेट वर्थबद्दल जाणून घेऊया. यासोबतच कमाईच्या बाबतीत नवऱ्याला मात देणाऱ्या अभिनेत्रींची यादीही पाहू….
* कतरिना-विकीची एकूण संपत्ती
कतरिना एका चित्रपटासाठी 9 ते 10 कोटी रुपये घेते आणि वर्षाला 22 ते 23 कोटी रुपये कमावते. ब्रँड एंडोर्समेंटसाठी कतरिना ६-७ कोटी रुपये घेते. तिची वार्षिक कमाई सुमारे 220 कोटी आहे. तर विकी कौशल त्याच्या चित्रपटांसाठी 3 ते 4 कोटी रुपये घेतो. त्याची एकूण संपत्ती 22 कोटींच्या आसपास आहे.
* दीपिका पदुकोण-रणवीर सिंग
दीपिका आणि रणबीरच्या जोडीला बॉलिवूडचं पॉवर कपल म्हटलं जातं. दोघांची लव्हस्टोरी आणि लग्न हे चर्चेत होते. तसेच दोघेही बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चित्रपट करत आहेत. पण कमाईच्या बाबतीत दीपिका रणवीरपेक्षा पुढे आहे. दीपिकाची वार्षिक कमाई 316 कोटी रुपये आहे, तर रणवीरची एकूण संपत्ती 307 कोटी रुपये आहे.
* ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन
नाव असो किंवा प्रसिद्धी असो, ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनपेक्षा खूप पुढे दिसते. याच कारणामुळे अनेकदा अभिषेक ट्रोल्सच्या निशाण्यावर दिसला आहे. ऐश्वर्याची वार्षिक कमाई 227 कोटी रुपये आहे तर अभिषेकची एकूण संपत्ती 203 कोटी रुपये आहे.
* प्रियांका चोप्रा-निक जोनास
बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये नाव कमावलेल्या प्रियांका चोप्राने जोधपूरमध्ये अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केले. दोघांच्या लग्नाला जगभरातून कव्हरेज मिळाले. कमाईबद्दल बोलायचे झाले तर प्रियांका चोप्राची वार्षिक संपत्ती 70 मिलियन आहे. तर तिच्या पतीची कमाई जवळपास 30 मिलियन आहे.
* बिपाशा बसू-करण सिंग ग्रोव्हर
बिपाशा बसूने करण सिंगसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटले होते. करण हे टीव्हीचे एक प्रसिद्ध नाव आहे, यासोबतच त्याने अनेक बॉलिवूड चित्रपट केले आहेत. बिपाशाची वार्षिक कमाई 113 कोटी रुपये आहे आणि करणची कमाई फक्त 13 कोटी रुपये आहे.