Aroh Welankar : अभिनेता रणवीर कपूरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट सुपरहिट होत आहे. बॉक्स या चित्रपटाने 600 कोटींहून अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये यांची एंट्री झाल्याने चित्रपटाला चारचाँद लागले आहेत. यानंतर आता आणखी एक मराठमोळा अभिनेता बॉलीवूडमध्ये एंट्री करणार आहे. अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) आगामी चित्रपटामधून अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Welankar) हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
आरोह त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. नुकतेच आरोहनं त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. आरोहनं एक खास पोस्ट शेअर करुन त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली आहे. कार्तिक आर्यनसोबतचे काही फोटो शेअर करुन आरोहनं कॅप्शनमध्ये लिहिलं, “And its a wrap. अद्भुत लोकांसोबत या अद्भुत चित्रपटाचे शूटिंग करताना मजा आली. पुढच्या वर्षी रिलीज होणाऱ्या माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटाची वाट पाहत आहे.”
View this post on Instagram
आरोहने त्याच्या या आगामी चित्रपटाच्या नावाची माहिती पोस्टमध्ये दिलेली नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं असून या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. कबीर खान यांनी यापूर्वी बजरंगी भाईजान, 83, एक था टायगर, ट्युबलाईट यांसारख्या दमदार चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे आरोहचा हा पहिला हिंदी चित्रपट सुपरहिट ठरणार असल्याचे म्हंटले जात आहे.
आरोहच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, आरोहने हॉस्टेल डेज, फनरल, रेगे या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्याने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता.