मुंबई – अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी पुढे समीर विद्वांस दिग्दर्शित सत्यप्रेम की कथा या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. सत्यप्रेम की कथा मधील कार्तिक आणि कियारा वधू – वर म्हणून दिसणार असल्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी ‘सत्यप्रेम की कथा’ मध्ये एकमेकांच्या अपोजिट दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव आधी ‘सत्यनारायण की कथा’ असे होते. आता त्याच्या शूटिंगचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये लग्नाचे क्षण दिसत आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यन वराच्या अवतारात आणि कियारा अडवाणी वधूच्या अवतारात दिसत आहे.
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी पांढरे पारंपारिक वेडिंग आऊटफिटमध्ये लग्नाच्या विधी पूर्ण करतांना दिसत आहेत. मात्र, दोघांच्याही चेहऱ्यावर आनंदाऐवजी दुःख दिसत आहे. त्याचवेळी कार्तिक आर्यन भावुक होऊन अश्रू पुसताना दिसत आहे, हा संपूर्ण सीन लीक झाल्यानंतर सध्या चाहत्यांना या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. साजिद नाडियादवाला निर्मित ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. कार्तिक-कियाराने यापूर्वी ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.