मुंबई – अभिनेत्री ऐश्वर्या रायचा मल्टीस्टारर चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन 1’ सुपरही़ट झाला होता. त्यानंतर आता तिच्या ‘पोन्नियिन सेल्वन 2’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ‘पोन्नियिन सेल्वन 2’चा ट्रेलर बुधवारी चेन्नईमधील नेहरू स्टेडियममध्ये लाँच करण्यात आला. हा ट्रेलर सध्या अनेकांच्या पसंतीस पडत आहे. ऐश्वर्याने पहिल्या भागात चोल साम्राज्याचा खात्मा करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या भागात राजकुमारी नंदिनी ही प्रतिज्ञा पूर्ण करताना दिसणार आहे. या ट्रेलरमधील भव्य सेट आणि थक्क करणारे सीन्स पाहायला मिळत आहेत. येत्या 28 एप्रिल रोजी पोनियिन सेल्वन 2 हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ऐश्वर्या रायने मोठ्या ब्रेकनंतर ‘पोन्नियिन सेल्वन 1’ या चित्रपटापटाद्वारे तमिळ सिनेसृष्टीत पुनरागमन केले होते. यात तिने नंदिनी आणि तिची आई मंदाकिनी देवी अशा दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. यातील तिच्या अभियाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. जगभरात ‘पोन्नियिन सेल्वन 1’ ने 500 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या दुसरा भागालाही तितकाच प्रतिसाद मिळणार का? हे पाहवे लागणार आहे. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पोन्नियिन सेल्वन 2’ चा ट्रेलर पाहून चाहत्यांची चित्रपटाची उत्सुकता अधिक वाढली आहे.