कार्तिक आर्यनने बॉलिवूडमध्ये खूपच कमी वेळात आपला स्वतःचा एक फॅन बेस तयार केला आहे. चॉकलेट बॉय अशी इमेज असल्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये महिलांचाच भरणा अधिक आहे. सदोदित मुलींच्याच गराड्यात असलेल्या कार्तिक आर्यनचा एक व्हिडीओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला. त्यामध्ये त्याची एक फॅन गर्ल चक्क त्याचे गाल ओढताना दिसते आहे. आणखी एक व्हिडीओ नंतर व्हायरल झाला आहे.
त्यामध्ये एक मुलगी चक्क कार्तिक आर्यनला प्रपोज करताना दिसते आहे. या मुलीने टिपिकल प्रपोजची स्टाईल मारली आहे. ती कार्तिक आर्यनच्या समोर गुडघ्यावर बसली आहे. तिने फिल्मी स्टाईलमध्ये कार्तिकसमोर आपल्या प्रेमाचे प्रमोजल मांडले आहे. या मुलीने 15 दिवसांसाठी आपल्या कॉलेजला दांडी मारली आणि कार्तिकची एक झलक मिळवण्यासाठी ती त्याच्या घराबाहेरच ताटकळत उभी असायची.
एवढी प्रतिक्षा केल्यचे फळ तिला लवकरच मिळाले. कातिक आणि तिची भेट झालीच. त्यावेळी कोणतीही प्रस्तावना वगैरे न करता तिने थेट विषयालाच हात घातला आणि कार्तिकला प्रपोज करून टाकले. या अचानक आलेल्या प्रपोजलमुळे कार्तिक थोडा गडबडला असावा. या मुलीला सांभाळले. नंतर केवळ सेल्फीच्या अटीवर या मुलीने त्याची सुटका केली.