अभिनेता कार्तिक आर्यन ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कार्तिक, कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २० मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, अभिनेत्याने या प्रकरणावर मौन सोडले आहे, ज्याबद्दल चाहत्यांना गेल्या दोन वर्षांपासून जाणून घ्यायचे होते. सारा अली खानसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल बोलत आहोत, ज्यावर कार्तिकने यापूर्वी कधीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
अभिनेत्री सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये तिचे वडील सैफ अली खानसोबत सहभागी झाली. त्यावेळी तिने खुलासा केला की, तिला कार्तिक आर्यनवर क्रश आहे. यानंतर तिने कार्तिकसोबत इम्तियाज अलीचा ‘लव्ह आज कल 2’ हा चित्रपट केला. चाहत्यांना त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आवडली आणि त्याचवेळी त्यांच्या लिंकअपच्या बातम्याही पसरल्या.
मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्यानंतर सारा आणि कार्तिकने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले. त्यानंतर दोघेही एकत्र दिसले नाहीत. दोन्ही स्टार्सने त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलले नाही, पण आता कार्तिकने मौन तोडले आहे.
‘भूल भुलैया 2’ च्या प्रमोशनच्या वेळी कार्तिक आर्यनला विचारण्यात आले की, सारासोबतच्या नात्याबाबत विचारण्यात आले की, हा सगळा केवळ सिनेमाच्या प्रमोशनचा डाव आहे का! यावर कार्तिक म्हणाला, ‘नाही, सर्व काही प्रमोशनल नव्हते. मी पण माणूस आहोत. सर्व काही प्रमोशनल नसते. या विषयावर मला एवढेच सांगायचे आहे.असंही कार्तिक म्हणाला.
वर्क फ्रंटवर बाबत सांगायचं झाल्यास, सारा आणि कार्तिककडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. साराने विकी कौशलसोबत एक अनटाइटल्ड सिनेमा शूट केला. यासोबतच ती विक्रांत मॅसीसोबत ‘गॅस लाईट’मध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर कार्तिककडे ‘शेहजादा’ आणि ‘कॅप्टन इंडिया’ चित्रपट आहेत.