भोर -भोर ालुक्यात रविवारी (दि. 26) चारजणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. भोर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या दररोजच वाढत आहे, त्यामुळे करोना काही केल्या भोरकरांची पाठ सोडेना, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनान शर्थीचे प्रत्न करत आहे. तरीही तालुक्यात मुंगीच्या पावलांनी करोना खेड्यापाड्यात आपले हातपाय पसरत आहे. करोना बाधितांनी आजपर्यंत 169 आकडा पार केला आहे.
कासुर्डी (गुं.मा.) 1, मोहरी 1, हातवे बुद्रुकची सणसवाडी 1, उत्रौली 1 असे एकूण चार करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी दिली.
भोर तालुक्यात आज अखेर 169 करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. 117 जणांनी करोनावर मात केली आहे. 50 जणांवर उपचार सुरु असून आजपर्यंत 610 जणांची तपासणी करण्यात आली असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगीतले.