मंचर -आंबेगाव तालुक्यात आदिवासी पश्चिम भागातील कोंढरे येथे देहूरोड येथून आलेल्या एका 29 वर्षीय गरोदर महिलेला करोनाची लागण झाली आहे. शनिवारी (दि. 13) महिलेचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. देहूरोडवरून मंगळवारी (दि. 9) ही महिला कोंढरे येथे आली होती. ती 5 महिन्यांची गरोदर आहे. तिला पोटदुखणे, हातपायांना सूज, फिट येत असल्याने गुरुवारी (दि. 11) तळेघर येथील आरोग्य केंद्रात तपासणी करून मंचर ग्रामीण रुग्णालयात नेले. पुढे तपासणीसाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठविले. तिचा अहवाल (दि. 13) पॉझिटिव्ह आला. रविवारपासूनच संपूर्ण गाव बंद केले आहे.
महिलेच्या कुटुंबातील आई, वडील, सासू, दीर, जाऊ, पती, गाडीचालक 2, नातेवाईक कोढवळचे 2, जांबळेवाडी(आसाणे) 3, भोईरवाडी 1, नर्स-1 असे व्यक्ती संर्पकात आले आहेत. त्यांना गावात व काहीजणांना गावाबाहेर शेतात क्वारंटाइन केले आहे.