मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘बॉबी देओल’ स्टारर वेबसीरिज “आश्रम’चा पहिला सीझन चांगलाच गाजला होता. या सीझनमधील बॉबीच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले होते. लवकरच या वेबसीरिजचा दुसरा सीझन अर्थात ‘आश्रम 2′ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. दरम्यान, “आश्रम 2’ ही वेब सीरिज प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडली.
करणी सेनेने प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. धार्मिक भावना, प्राचीन सांस्कृतिक आणि आश्रम धर्म यांच्याविषयी चुकीचा समज पसरविल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, आपल्याकडून ‘आश्रम’ या वेब सीरीजला किंवा त्यांच्या निर्मात्यांना कुठलीही नोटीस पाठवली नसल्याचे स्पष्टीकरण करणी सेनेकडून देण्यात आले आहे. करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेचे राज्य संघटन मंत्री सुरजित सिंह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर भाष्य केले आहे.
कल से एक न्यूज़ चल रही है की सूरजीत सिंह ने फ़िल्म निर्देशक @prakashjha27 को एक नोटिस भेजा। है इसको लेकर बहुत सारे न्यूज़ पत्रकार साथियो का फ़ोन आया था लेकिन में स्पष्ट करता हूँ मैने कोई नोटिस नही भेजा है (ये फ़र्ज़ी नोटिस है ) @ZeeNews @ABPNews @Republic_Bharat @republic
— surjeet singh Rathore (युवा अध्यक्ष ) (@surrjeetrathore) November 6, 2020
‘आश्रम 2’चा ट्रेलर आणि ही संपूर्ण वेबसीरिजच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणी सेनेने केली होती. आश्रम वेब सीरीजमध्ये बॉबी देओल व्यतिरिक्त अदिती पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ही सीरिज येत्या 11 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Rakshak ya Bhakshak?
Paavan ya Paapi?
Kya hai Kashipur waale Baba Nirala ka asli roop?
Hoga khulasa 11-11-2020 ko #AashramChapter2 sirf @mxplayer par.#MXPlayer #MXOriginalSeries@prakashjha27 @AaditiPohankar @IamRoySanyal @DarshanKumaar @anupria_goenka @AdhyayanSsuman @iamtridha pic.twitter.com/8pGVP5QSi2— Bobby Deol (@thedeol) October 29, 2020