मुंबई – ‘बाहुबली’ चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची ३९ वर्षे पू्र्ण केली आहेत.
जाणून घेऊया तिच्याबद्दल काही रंजक गोष्टी….
-दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या या आघाडीच्या अभिनेत्रीचा 7 नोव्हेंबर 1981 रोजी मॅंगलोर जन्म झाला. तिचं खरं नाव स्वीटी शेट्टी आहे. अनुष्काने माऊंट कार्मल कॉलेज, बेंगळुरू येथून कॉम्प्यूटर अॅप्लिकेशनमधून ग्रॅज्यूएट केलं.
-‘बाहुबली’ मध्ये प्रभास आणि अनुष्काच्या जोडीला मोठी पसंती मिळाली.
-अनुष्काने तिच्या करिअरची सुरूवातीए २००५ मध्ये ‘सुपर’ या सिनेमाने केली होती. सिनेमात काम करायला सुरूवात करण्याआधी ती एक यशस्वी योगा टीचर होती.
-अनुष्काचं सौंदर्य पाहून एका दिग्दर्शकाने तिला सिनेमाची ऑफर दिली होती. अनुष्काचा ‘साईज झीरो’ हा तिच्या सर्वात खास सिनेमांपैकी एक मानला जातो. या सिनेमासाठी अनुष्काने आपलं २० किलो वजन वाढवलं होतं.
गेल्या एका दशकापासून आपली जादू चालवणा-या अनुष्काने टॉलीवूडमध्ये २००५ मध्ये डेब्यू केलं होतं. अनुष्काने तिच्या १२ वर्षांच्या करिअरमध्ये २० पेक्षा अधिक तमिळ आणि तेलगु सिनेमांमध्ये काम केलं आहे.
View this post on Instagram
with Director Ragavendrarao garu from the sets of #OmNamoVenkatesaya movie ?
तिचे ‘बाहुबली’ आणि ‘रूद्रमादेवी’ सारख्या सिनेमांची नोंद आहे. त्यानंतर आता तिच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.