बेंगळुरू/बल्लारी :- भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी आज आपल्या राजीनाम्याचे वृत्त अफवा असल्याचे नमूद करीत ते फेटाळून लावले.
बेंगळुरूमध्ये जारी केलेल्या निवेदनात कटील यांनी स्पष्ट केले की, त्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही.
बल्लारी येथे पत्रकारांशी संवाद साधताना, कटील यांनी गेल्या महिन्यात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. 224 सदस्यीय विधानसभेत कॉंग्रेसने 135 जागांसह विजय मिळवल्यामुळे भाजपने राज्यातील सत्ता गमावली. भाजपला केवळ 66 जागा मिळाल्या.
कटील म्हणाले की, आमच्या पक्षाच्या नेत्यांनी पक्षाच्या पराभवाची कारणे या आधीच स्पष्ट केली आहेत. ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे या पदाबाबत योग्य वेळी निर्णय होईल पण मी राजीनामा दिलेला नाही.