मुंबई – करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील सर्वात फॅशनेबल अभिनेत्रींपैकी एक आहे. बेसिक टी आणि जीन्स लूक असो, बोल्ड ड्रेस असो किंवा साडी लूक असो, करीना नेहमीच आपल्या फॅशन लुकमुळे चर्चेत असते. अलीकडे, करीनाला इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेदबद्दल विचारण्यात आले जी तिच्या फॅशनमुळे चांगलीच चर्चेत आहे.
करीना नुकतीच फिजी ग्लोबेट स्टोअर येथे दिसली जिथे तिला मीडियाने अनेक प्रश्न विचारले. ज्यावर बेबोने उर्फीचे जोरदार कौतुक केले. करीना म्हणाली, उर्फी ज्या प्रकारची फॅशन कॅरी करते, त्यासाठी धैर्य आणि आत्मविश्वास लागतो, जो फक्त उर्फीकडे आहे.’
यानंतर वृत्तमाध्यमांशी बोलतांना करिनाने पुन्हा उर्फी जावेदचे कौतुक केले. करीना कपूर म्हणाली, “फॅशन देखील भाषणाच्या अभिव्यक्तीसारखी असते. मला वाटते की उर्फीच्या आत्मविश्वासाने ती खूप छान आणि आश्चर्यकारक दिसते.” असं म्हणत करीनान उर्फीचे कौतुक केले आहे.
करिनाची ही मुलाखत वाचल्यानंतर उर्फीच्या आनंदाला पारावार उरला नाही. उर्फीने ट्विटरवर ही बातमी शेअर करून आनंद व्यक्त केला आहे. ज्यात तिने लिहिले आहे, “काय ? करीना म्हणाली ती मला आवड..! ‘ असं म्हणत उर्फीनेही करीनाला थँक्स म्हटले आहे.