मुंबई – बॉलीवूडसह मराठी कलाकारांनी नवं घर खरेदी केले आहे. यात अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाक्षी सिन्हा आणि स्मिता शेवाळे यांचा समावेश आहे. यातच आता टीव्ही अभिनेता करण कुंद्राने (Karan Kundra) देखील मुंबईमध्ये नवे घर खरेदी केले आहे. नुकतेच करणने त्याच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. समुद्र किनारऱ्यालगत असलेले या घराची करणने पहिली झलक दाखवली आहे.
करण कुंद्राचे हे नवं घर बांद्रा येथील अपार्टमेंटमध्ये 12 व्या मजल्यावर आहे. या घराची किंमत 14 कोटी ते 20 कोटी असल्याचा अंदाज अनेकजण लावत आहे. मागील वर्षी त्याने हे घरं खरेदी केले होते. मात्र यंदाच्या गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर त्याने या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. याचा व्हिडिओ करणने सोशल मीडियावर शेअर केले असून, यात तो होम-हवन, पूजा करताना दिसत आहे. करणच्या या नव्या घरातील लिव्हिंग रुम, बेडरूम आणि किचन पाहायला मिळत आहे. त्याच्या या आलिशान घराची झलक प्रेक्षकांच्याही पसंतीस पडली आहे.
𝙉𝙚𝙬 𝙗𝙚𝙜𝙞𝙣𝙣𝙞𝙣𝙜𝙨, 𝙉𝙚𝙬 𝙢𝙚𝙢𝙤𝙧𝙞𝙚𝙨, 𝙉𝙚𝙬 𝙝𝙤𝙢𝙚. 𝘾𝙤𝙣𝙜𝙧𝙖𝙩𝙪𝙡𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙨 𝙆𝙖𝙧𝙖𝙣 !
May your dream home be always filled with joy, peace, happiness and endless love. Happy housewarming ❤️🧿#KaranKundrra #TejRan #TejRanFam pic.twitter.com/T92gQsqB6c
— 𝐓𝐄𝐉𝐑𝐀𝐍 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐈𝐀𝐋𝐒 (@TejRanOfficials) September 25, 2023
करणने त्याच्या नव्या घरात प्रवेश केल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. करण कुंद्राने नुकतेच त्याच्या ‘तेरे इश्क में घायाल’ या शोचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यानंतर करण कुंद्रा, भूमी पेडणेकर आणि शहनाज गिलसोबत त्याच्या आगामी ‘थँक्स फॉर कमिंग’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 6 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.