आसिम रियाझ याने “बिग बॉस 13’च्या ग्रॅंड फिनालेमध्ये धडक मारली आहे. यात विजेतेपदासाठी सिद्धार्थ शुक्ला, शहनाज गिल आणि रश्मी देसाई यांच्यात सामना रंगणार आहे.
आता आसिम रियाझबाबत बॉलीवूडमधील प्रोड्यूसर कमाल आर खान यांनी दावा केला आहे की, करण जोहर आसिम रियाझला बॉलिवुडमध्ये लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे त्याच्यसोबत शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही चित्रपटसृष्टीत पाउल ठेवणार असल्याचे समजते.
कमाल आर खान यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “करण जोहर हे आसिम रियाझला शाहरुख खानची मुलगी सुहाना खानसोबत “स्टूडेंट ऑफ द इयर-3’साठी साईन करणार आहेत.’ या ट्विटवर चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच सुहानाच्या बॉलीवूडमधील डेब्यूबाबत प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, आसिम रियाझची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. काही दिवसांपूर्वी डब्ल्यूडब्ल्यूई स्टार आणि हॉलीवुड अभिनेता जॉन सीनाने फोटो शेअर केला होता. एवढेच नव्हे तर फास्ट ऍण्ड फ्यूरियसच्या टीमनेही त्याच्याबाबत एक ट्विट केले होते.
View this post on Instagram