करण देओल हा एक “स्टार किड’ आहे. त्याचे वडील सनी आणि आजोबा धर्मेंद्र असल्याने करण आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करेल आणि प्रेक्षकांनाही त्यांचा चित्रपट आवडेल, असे निर्माता-दिग्दर्शक इंद्र कुमार यांना वाटत होते. ‘पल पल दिल के पास’ रिलीज होण्यापूर्वी आणि चित्रपट न पाहता इंद्राने करणला साइन केले होते.
मात्र त्यांनी या प्रकरणाची अधिकृत घोषणा केली नव्हती. कदाचित त्यांना करणच्या पहिल्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसचा निकाल पहायचा होता. “पल पल दिल …’प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली.
ज्यांनी हा सिनेमा पाहिला त्यांना मुळीच आवडला नाही. करण देओलच्या अभिनयानेही प्रेक्षकांना प्रभावित केले नाही. त्याचा परिणाम असा झाला की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईट आपटला. त्यामुळे इंद्राने करणबरोबर चित्रपट बनवण्याची कल्पनाच सोडून दिली आहे. म्हणजेच करण देओलचा दुसरा चित्रपट सुरू होण्यापूर्वीच थांबला आहे.
तसे, असेही म्हटले जात आहे की इंद्र कुमार सध्या काही आर्थिक अडचणींमध्ये आहेत आणि म्हणूनच कदाचित त्यांना यावेळी एखादा चित्रपट सुरू करण्याची इच्छा नसेल. कारण काहीही असो पण सनीच्या पोरासाठी ही काही चांगली सुरुवात म्हणता येणार नाही.