उंब्रज – पाल (ता. कराड) येथील खंडोबा यात्रेत आज शनिवारी करोना निर्बंधामुळे शुकशुकाट होता. या यात्रेसाठी दरवर्षी ५ ते ६ लाख भाविक असतात. यंदा निर्बंध असल्याने सर्वत्र शांतता आहे. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रथोत्सवास दरवर्षी लाखो भाविक सहभागी होतात. यावर्षी रथाला परवानगी नसल्याने व संचारबंदीमुळे शुकशुकाट जाणवत आहे.