कराड (प्रतिनिधी) – म्हारुगडेवाडी (ता. कराड) येथे ६० वर्षीय करोना बाधित रूग्ण आढळून आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या ३५ जणापैकी म्हारुगडेवाडी व जिंती येथील ३१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर चौघांचे रिपोर्ट यायचे आहेत.
निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने जिंती व म्हारुगडेवाडी येथील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्यांना पार्ले येथील विलगिकरण कक्षात दाखल केले तर काही जणांना होम क्वारंटाइन शिक्के मारून घरी सोडण्यात आले आहे.
म्हारुगडेवाडी येथे दुसरा करोना बाधित रुग्ण सापडल्याने प्रशासनासह परिसरात एकच खळबळ उडाली होती. ग्रामीण भागात कोरोना शिरकाव केल्याने अनेकांनी धास्ती घेतली होती. करोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील ३५ जणांच्या घशांचे स्त्राव करोना टेस्टसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. यापैकी ३१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर ४ जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत.