आग्रा – बस चालकाला डुलकी लागल्याने बस डंपरवर आदळून अपघात झाला आहे. या अपघातात 40 प्रवाशी जखमी झाले आहेत तर त्यापैकी अनेक जण गंभीर आहेत. हा अपघात आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर दिल्लीहून लखनौला जात असताना सौरीख पोलीस स्टेशन हद्दीतील 150 किलोमीटर अंतरावरील सलेमपूर गावासमोर झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, चालक मध्येच अडकला.
या अपघाताची माहिती मिळताच पोहोचलेल्या यूपीडीएचे कर्मचारी आणि पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढले. तर किरकोळ जखमी प्रवाशांना वैद्यकीय महाविद्यालय तिरवा येथे दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या वेळी बसमध्ये बसलेले प्रवासी झोपले होते. अचानक अपघात झाल्याने बसमध्ये एकच गोंधळ उडाला. बसमधील प्रवाशांना दुसऱ्या वाहनाने पाठवण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. चालकासह अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.