Kangana Ranaut – श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने राम मंदिरातील रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी देशभरातील नामवंत व्यक्तींना म्हणजेच VVIP व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले. याबाबतची सम्पूर्ण यादी देण्यात आली, या यादीत तीन हजार व्हीव्हीआयपींसह एकूण सात हजार जणांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. ‘रामायण’मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि देवी सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया यांचीही नावे या यादीत आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत कंगना राणावतचे नाव नाही.
हा सोहळा 22 जानेवारी 2024 ला होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, चित्रपट स्टार अमिताभ बच्चन आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह सुमारे सात हजार लोकांना निमंत्रण पाठवली आहे.
मनोरंजन विश्वाशी निगडित सेलिब्रिटींबद्दल सांगायचे तर, सोहळ्यासाठी अमिताभ बच्चन, रामायणच्या राम-सीता म्हणजेच दीपिका चिखलिया, अरुण गोविल, अक्षय कुमार, आशा भोसले यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. नवीन राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाची वेळ सकाळी 11 ची असल्याचे सांगण्यात आले.
अशात गेल्या महिन्यात कंगना रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचली होती, जिथे तिने राम मंदिर आंदोलनात प्राण गमावलेल्या लोकांची आठवणही केली होती. तसेच मंदिर बांधणाऱ्या लोकांशी संवाद साधला होता. अयोध्या मंदिराबाबत कंगनाने यापूर्वीही वक्तव्ये करत आहेत. अशात व्हीव्हीआयपीमध्ये नाव नसल्याने आता तिला सोशल मीडिया युजर्स ट्रोल करत आहे.