Bigg Boss Marathi 5| छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी 5′ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर बिग बॉस मराठी 5’ संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. नुकताच कलर्स मराठीकडून या शोचा प्रोमो शेअर केलेला आहे. यातून एक मोठा खुलासा झाला. आतापर्यंत या शोचे चार सीझन झाले असून या कार्यक्रमाचं होस्टिंग महेश मांजरेकर करते होते. मात्र आता पाचव्या पर्वात प्रसिद्ध अभिनेता हा शो होस्ट करणार आहे.
नुकताच कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस मराठी 5’ चा नवा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे. शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये, महेश मांजरेकरांच्या ऐवजी आता प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी’चा नवा होस्ट असणार आहे. “मराठी मनोरंजनाचा “BIGG BOSS” सर्वांना “वेड” लावायला येतोय… “लयभारी”होस्ट, सुपरस्टार रितेश देशमुख !” असं कॅप्शन देत हा नवा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे.
View this post on Instagram
या नव्या सिझनद्वारे प्रेक्षकांना मोठे सरप्राईज मिळाले आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीचा हा नवा प्रोमो पाहून रितेशचे चाहते देखील आनंदी झाले आहेत.’बिग बॉस’च्या हिंदी शोला मिळालेल्या मोठ्या यशानंतर मराठीतील कार्यक्रमाला देखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. Bigg Boss Marathi 5|
“बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझनने मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली. मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली होती. आता ‘बिग बॅास’ मराठीच्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झाली. आता या नव्या पर्वात नव्या थीमबाबत , स्पर्धकांबाबत प्रेक्षकांनाही उत्सुकता लागली आहे. Bigg Boss Marathi 5|
हेही वाचा:
“सचिनच्या जाहिरातीमुळेच सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला”; बच्चू कडूंनी आरोप करत दिला आंदोलनाचा इशारा