Kangana Ranaut | Lok Sabha Election 2024 – हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार, अभिनेत्री-निर्माती कंगना राणावत हिच्या प्रवेशाने हिमाचल प्रदेशपासून दिल्लीपर्यंतचे राजकारण चांगलेच तापले आहे. तिने सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर भाजपने एकीचा संदेश दिला असून, निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी कंबर कसली आहे.
कंगनासह भाजपनेही काँग्रेसला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे कंगनाच्या मंडीच्या रणधुमाळीत एंट्रीमुळे काँग्रेसमध्येही उमेदवाराच्या चर्चेला उधाण आले आहे. कंगनाच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता तिच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. मंडी ही कंगनाची जन्मभूमी आहे.
नुकताच मंडीत कंगनाने रोड शॉ देखील केला. यावेळी तिनं लोकांना संबोधित करताना म्हटलं की, ‘जर मी इथे निवडून आले तर तुमच्या सेवेत मी कोणतीही कमरता भासू देणार नाही. तुम्ही हा विचार करु नका की कंगना एक अभिनेत्री आहे, । Kangana Ranaut | Lok Sabha Election 2024
#WATCH | Himachal Pradesh: BJP candidate from Mandi Lok Sabha seat, actor Kangana Ranaut says, “… Congress could not accept my nomination from Mandi. They started doing cheap politics. Their leader Rahul Gandhi talks about destroying the ‘shakti’ in Hindus. Their spokesperson… pic.twitter.com/D53fySekCz
— ANI (@ANI) March 29, 2024
हा विचार करु नका की कंगना एक स्टार आहे, हा विचार करा की कंगना आपली मुलगी आहे, आपली बहिण आहे. इथला प्रत्येकजण माझा नातेवाईक आहात.’ तसेच यावेळी मोदींच्या समर्थनार्थ आणि जय श्रीराम या घोषणा देखील देण्यात आल्यात.
कंगनाने यावेळी तिच्या भाषणादरम्यान राहुल गांधी आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. यावर तिनं म्हटलं की, ‘आपल्याच घरातून उमेदवारी मिळणं ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. पण काँग्रेसला ही आनंदाची गोष्ट बघवली नाही जात.
त्यांनी त्यांच्या घाणरेड्या राजकारणाला सुरुवात केली. ‘त्यांच्या मुख्य नेतृत्व राहुल गांधी यांनी म्हटलं की, हिंदूमध्ये जी शक्ती आहे ती मला नष्ट करायचीये’, असं म्हणत कंगनाने राहुल गांधींवर निशणा साधला. । Kangana Ranaut | Lok Sabha Election 2024