Live Cricket Score, LSG vs PBKS Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 च्या 11 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज आज आमनेसामने येणार आहेत. हा सामना एलएसजीच्या होम ग्राउंड एकना स्टेडियम, लखनऊ येथे संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
तत्पूर्वी, कर्णधार केएल राहुलच्या अनुपस्थितीत लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यष्टीरक्षक फलंदाजाऐवजी निकोलस पुरन संघाची धुरा सांभाळताना दिसत आहे.
या सामन्यात जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि कागिसो रबाडा हे पंजाबसाठी परदेशी खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहेत. तर, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉइनिस हे लखनौसाठी परदेशी खेळाडू म्हणून खेळताना दिसतील.
🚨 Toss Update 🚨@LucknowIPL win the toss and elect to bat against @PunjabKingsIPL.
Follow the Match ▶️https://t.co/HvctlP1JOJ #TATAIPL | #LSGvPBKS pic.twitter.com/D3FiVVMBgo
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2024
LSG vs PBKS : दोन्ही संघाचे प्लेइंग 11 पुढीलप्रमाणे…
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
इम्पॅक्ट सब : प्रभसिमरन सिंग, रिले रुसो, तनय थागराजन, विदावथ कावेरप्पा, हरप्रीत भाटिया.
लखनौ सुपर जायंट्स : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बदुनी, निकोलस पूरन (क), मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ.
इम्पॅक्ट सब : ॲश्टन टर्नर, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, दीपक हुडा, के गौतम.
IPL 2024 (#LSGvsPBKS Match 11) : ‘गब्बर’ धवनला एक खास विक्रम नावावर करण्याची संधी, फक्त एक पाऊल दूर…
दरम्यान, लखनौने या मोसमातील पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला. यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर पंजाबने या कालावधीत दोन सामने खेळले आणि एक जिंकला. पंजाब आणि लखनौचे संघ यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.