कंगनाचा “थलायवी’ खूप चर्चेत आहे. अलीकडेच या सिनेमाचे ट्रेलर देखील रिलीज झाले आहे. “थलायवी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे अलीकडेच घोषित केले गेले आणि त्यावर कंगनाने आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘थलायवी’ 23 एप्रिलला रिलीज केला जाणार होता. मात्र निर्मात्यांनी रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र अलीकडे समजलेल्या माहितीनुसार आता “थलायवी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. यावर कंगनाने एक पोस्ट टाकली आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मला अधिकार दिल्यामुळे आता थिएटरमध्ये हा सिनेमा रिलीज होऊ शकणार नाही.
मात्र मूवी माफियाकडे दुर्लक्ष करून “थलायवी’ थिएटर मधेच रिलीज केला जावा असे कंगनाने म्हटले आहे. निर्मात्यांवर दबाव आणणारे मुव्ही माफिया आणि आणि प्रसारमाध्यमांवर कारवाई केली जावी असे तिने म्हटले आहे. “थलायवी’ सारख्या सिनेमाला थिएटरमध्ये दाखवले जाण्याचा अधिकार आहे, त्याच्या ट्रेलरला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादावरून हे लक्षात येते आहे, असेही कंगनाने म्हटले आहे.