Bishan Singh Bedi Death: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांच्या निधनावर क्रिकेटपटूंपासून राजकारण्यांनी शोक व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि क्रिकेटपटू इरफान पठाण यांच्यासह अनेकांनी बेदी यांच्या निधनामुळे क्रिकेट जगताचे नुकसान झाले असल्याचे म्हंटले आहे.
अमित शाह म्हणाले, “महान फिरकीपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. बेदी केवळ क्रिकेट विश्वातील त्यांच्या योगदानासाठीच नव्हे तर खेळपट्टीवर जादू निर्माण करणारे कुशल गोलंदाजीचे मास्टर म्हणूनही आमच्या आठवणींमध्ये जिवंत राहतील. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या चाहत्यांप्रती माझ्या संवेदना.”
Deeply saddened by the demise of the legendary spinner and former captain of the Indian cricket team Bishan Singh Bedi Ji. Bedi Ji will live in our memories not only through his contribution to the cricketing world but also as the master of crafty bowling who could weave magic on…
— Amit Shah (@AmitShah) October 23, 2023
बिशन सिंह बेदी 77 वर्षांचे होते. बेदी यांचा जन्म 1946 मध्ये अमृतसर येथे झाला होता. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, त्यांनी भारतासाठी 67 कसोटी खेळल्या आणि 266 विकेट घेतल्या आहेत. इरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर आणि श्रीनिवास वेंकटराघवन यांचा समावेश असलेल्या भारतीय क्रिकेटच्या फिरकीपटूंच्या सुवर्ण चौकडीचा ते एक भाग होते.
कोण काय म्हणाले?
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि गोलंदाज म्हणून देश बिशन सिंग बेदी यांची आठवण ठेवेल. बेदी आता आमच्यात नाहीत. हे क्रिकेट जगताचे नुकसान आहे.”
Bishan singh bedi One of our best is no more. It’s a loss to our cricketing fraternity. My deep condolences to his family.
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 23, 2023
माजी क्रिकेटपटू इरफान पठाण सोशल मीडियावर म्हणाले, “आमच्या सर्वोत्कृष्टांपैकी एक, बिशनसिंग बेदी आता राहिले नाहीत. हे आपल्या क्रिकेट जगताचे नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना.”
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. एक महान खेळाडू म्हणून ते कायम आमच्या आठवणींमध्ये जिवंत राहतील. ईश्वर दिवंगत आत्म्यास त्यांच्या चरणी शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना व त्यांच्या चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”
भारतीय क्रिकेट टीम के पूर्व कप्तान श्री बिशन सिंह बेदी जी का निधन अत्यंत दुःखद है।
वे एक महान खिलाड़ी के रूप में हमारी स्मृतियों में सदैव जीवित रहेंगे।
ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्री चरणों में स्थान तथा शोकाकुल परिजनों एवं उनके प्रशंसकों को यह दुःख सहने की शक्ति दें।
ॐ…
— Yogi Adityanath (@myogiadityanath) October 23, 2023
जयराम रमेश काय म्हणाले?
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, “भारतातील क्रिकेट दिग्गजांपैकी एक असलेले बिशन सिंग बेदी आता राहिले नाहीत. हे दुःखद आहे. ते एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आणि फ्रेम्ड क्वार्टरचे सदस्य होते.”
One of India’s all-time cricket legends, Bishen Singh Bedi, is sadly no more. He was an oustanding spin bowler and a member of the famed quartet. On and off the field, he was a charming and colourful personality who spoke his mind fearlessly at all times. A conversation with him…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) October 23, 2023
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, “भारतीय क्रिकेटचे दिग्गज बिशनसिंग बेदी यांच्या निधनाबद्दल दुःख झाले. भारतीय संघाच्या माजी कर्णधाराने आपल्या डावखुऱ्या गोलंदाजीने भारताला अनेक संस्मरणीय क्षण दिले. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत.”