मुंबई – इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील 25 वा सामना आज खेळला जात आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨
Kane Williamson has won the toss & @SunRisers have elected to bowl against @KKRiders.
Follow the match ▶️ https://t.co/HbO7UhlWeq#TATAIPL | #SRHvKKR pic.twitter.com/WeAUCl11Mp
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2022
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या 15 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 8 सामने जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने येथे 7 वेळा विजय मिळवला आहे. याचा अर्थ या मैदानावर टाॅसचा फारसा फरक पडत नाही.
आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने तीन बदल केले आहेत. सॅम बिलिंग्ज, अजिंक्य रहाणे आणि रसिक सलाम यांच्या जागी शेल्डन जॅक्सन, अॅरॉन फिंच आणि अमन खान ( Sheldon Jackson, Aaron Finch & Aman Khan ) यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स संघाला एक बदल करावा लागला आहे. दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी जगदीश सुचितचा ( Jagadeesha Suchith ) संघात समावेश करण्यात आला आहे.
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन(विकेटकीपर), शशांक सिंग, मार्को यानसेन, जगदीश सुचित, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक
कोलकाता नाईट रायडर्स : आरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, सुनील नरेन, अमन खान, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव