Kolkata Knight Riders IPL 2024 : आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला . वास्तविक, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस एटकिंसन या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मात्र, शाहरुख खानच्या टीमने गस एटकिंसनच्या ऐवजी बदली खेळाडू शोधला आहे. गस एटकिंसनच्या ( Gus Atkinson ) जागी कोलकाता नाईट रायडर्सने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराला ( Dushmantha Chameera ) आपल्या संघाचा भाग बनवले आहे. अलीकडेच आयपीएल लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने गस एटकिंसनला एक कोटी रुपयांना विकत घेतले होते.
त्याच वेळी, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळला आहे. मात्र, आता कोलकाता नाईट रायडर्सने दुष्मंथा चमीराचा 50 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समावेश केला आहे. दुष्मंथा चमीरा हा IPL 2022 च्या हंगामात KL राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सचा एक भाग होता. त्या हंगामात दुष्मंथा चमीराने 12 सामन्यात 9 विकेट घेतल्या होत्या. पण IPL 2024 च्या लिलावात दुष्मंथा चमीराला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. मात्र, आता कोलकाता नाईट रायडर्सने दुष्मंथा चमेरा याला गस एटकिंसनच्या जागी संधी देत संघाचा भाग बनवले आहे.
🚨 NEWS 🚨@KKRiders name Dushmantha Chameera as replacement for Gus Atkinson.
More details 🔽 #TATAIPLhttps://t.co/ioBPp22mGi
— IndianPremierLeague (@IPL) February 19, 2024
दुष्मंथा चमीरा आयपीएल 2018 च्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होता. यानंतर तो आयपीएल 2021 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग बनला. लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2022 हंगामासाठी दुष्मंथा चमीराचा समावेश केला होता. पण आता या मोसमात हा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज कोलकाता नाईट रायडर्सच्या जर्सीत दिसणार आहे.
आयपीएल 2024 हंगामासाठी कोलकाता नाइट रायडर्स संघ – श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, शेरफेन रदरफोर्ड, केएस भरत, मनीष पांडे, जेसन रॉय, अंगक्रिश रघुवंशी, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, सुयश शर्मा, मुजीहमान उरमान, सुयश शर्मा. चमीरा, साकिब हुसेन, हर्षित राणा, सुनील नरेन, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क, चेतन साकरीया.