लखनऊ : हिंदुत्वादी नेते कमलेशतिवारी यांच्या हत्येच्या कटातील दोन संशयितांच्या अटकेसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रत्येकी अडीच लाख रूपयांचे इनाम जाहीर केले आहे.
या प्रकरणाच्या तपासात, लखनऊमधील एका हॉटेलमध्ये अशफकूल हुुसेन आणि मैनुद्दीन पठाण अशा नावाने दोघे 17 ऑक्टोबर रोजी उतरले होते. दुसऱ्या दिवशी हॉटेलमधून बाहेर पडताना त्यांनी भगवा वेश परिधान केला होता. तसेच त्यांच्या हातात मिठाईचे बॉक्स होते, अशी माहिती हाती आली आहे. पोलिस महासंचालक ओ. पी. सिंग यांनी त्यांच्यावर प्रत्येकी अडीच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
कमलेश तिवारी यांची भर वर्दळीच्या भागातील त्यांच्या निवासस्थानाजवळील कार्यालयात दि. 18 रोजी हत्या करण्यात आली होती. हॉटेलच्या खोलीतून पोलिसांनी भगाव कुर्ता आणि रक्ताचे डाग पडलेली बेडशीट जप्त केली. रक्त लागलेले टॉवेल आणि नव्या मोबाईलचा बॉक्सही पोलिसांनी येथून जप्त केला आहे.