पुणे – राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. मात्र पुणे कॅन्टोन्मेंट व शिवाजीनगर मतदारसंघात मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट मधील सेंट व्हिन्सेंट्स या मतदान केंद्रावर कमालीचा शुकशुकाट दिसून येत आहे. तर सर्वात कमी मतदान कॅन्टोन्मेंटमध्ये नोंदविले गेले आहे. अशीच काहीशी स्थिती शिवाजीनगर या मतदासंघातही दिसत आहे.