पिंपरी : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच राज्यात मतदान होत आहे. आज होत असलेल्या मतदानासाठी अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, पिंपरी पिंपरी-चिंचवड शहतील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीनही विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. शांततेत सुरू असणाऱ्या मतदान प्रक्रियेला हाणामारीमुळे गालबोट लागले आहे.
पिंपरी कॅम्पमध्ये सुरू असणाऱ्या मतदान केंद्राजवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात हाणामारी झाली. दरम्यान, या कार्यकर्त्यांच्या हाणामारीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, राज्यात आज 288 जागांसाठी मतदान होत आहे.