Kalyan Banerjee – विरोधी खासदारांच्या निलंबनानंतर सभागृहाबाहेर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उपराष्ट्रपतींची नक्कल केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गौतम नावाच्या वकिलाने डिफेन्स कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी ती स्वीकारली आहे. त्याआधारे तपास देखील सुरू करण्यात आला आहे. अभिषेकने आपल्या तक्रारीत उपराष्ट्रपतींचा अपमान केल्याचा दावा केला असून कल्याण बनर्जी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त चंदन चौधरी यांनी सांगितले की, काही वकिलांनी तक्रार दिली आहे. हे प्रकरण नवी दिल्ली जिल्ह्याशी संबंधित असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तक्रार करण्यात आली असून ती नवी दिल्ली जिल्हा पोलिसांकडे पाठवण्यात आली आहे.
या संबंधित तक्रार करण्यात आली असून त्या आधारे तपास सुरू आहे. हे प्रकरण सभागृहाबाहेरच असून तक्रारीवर कारवाई झाल्यास अटक होण्याची शक्यता आहे.
मात्र तक्रारीच्या आधारे कोणत्याही कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याता आला आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे याबाबत ठोस काहीही सांगता येत नाही.