Stock market holidays 2024: वर्ष 2023 शेवटच्या टप्प्यात आहे आणि नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे. स्टॉक एक्स्चेंज NSE ने 2024 मध्ये शेअर बाजाराच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी प्रसिद्ध केली आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्या व्यतिरिक्त विविध सण आणि वर्धापन दिनानिमित्त वर्षभरात 14 दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे.
जानेवारीत प्रजासत्ताक दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे. फेब्रुवारीमध्ये शनिवार आणि रविवार वगळता इतर सर्व दिवशी शेअर बाजार सुरु राहील. शेअर बाजार मार्चमध्ये तीन दिवस, एप्रिलमध्ये दोन दिवस, मेमध्ये एक दिवस, जूनमध्ये एक दिवस, जुलैमध्ये एक दिवस, ऑगस्टमध्ये एक दिवस, ऑक्टोबरमध्ये एक दिवस, नोव्हेंबरमध्ये दोन दिवस आणि डिसेंबरमध्ये एक दिवस बंद राहणार आहे.
2024 मधील शेअर बाजारातील सुट्टींची यादी-
– 26 जानेवारी 2024- प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारी शेअर बाजार बंद राहणार आहे.
– 8 मार्च 2024- महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी शेअर बाजार बंद राहणार आहे.
– 25 मार्च 2024- होळीनिमित्त सोमवारी शेअर बाजार बंद राहणार आहे.
– 29 मार्च 2024- गुड फ्रायडेच्या निमित्ताने शेअर बाजार शुक्रवारी बंद राहील.
– 11 एप्रिल 2024- ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त शेअर बाजार गुरुवारी बंद राहणार आहे.
– 17 एप्रिल 2024- रामनवमीनिमित्त बुधवारी शेअर बाजार बंद राहणार आहे.
– 1 मे 2024- महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी शेअर बाजार बंद राहणार आहे.
– 17 जून 2024- बकरीदनिमित्त सोमवारी शेअर बाजार बंद राहणार आहे.
– 17 जुलै 2024- मोहरममुळे बुधवारी शेअर बाजार बंद राहणार आहे.
– 15 ऑगस्ट 2024- स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजार गुरुवारी बंद राहील.
– 2 ऑक्टोबर 2024- गांधी जयंतीनिमित्त बुधवारी शेअर बाजार बंद राहणार आहे.
– 1 नोव्हेंबर 2024- दिवाळीनिमित्त शेअर बाजार शुक्रवारी बंद राहील.
– 15 नोव्हेंबर 2024- गुरु नानक जयंतीनिमित्त शेअर बाजार शुक्रवारी बंद राहणार आहे.
– 25 डिसेंबर 2024- ख्रिसमसनिमित्त शेअर बाजार बुधवारी बंद राहील.
2024 मधील मुहूर्त ट्रेडिंगचे वेळापत्रक जाणून घ्या-
1 नोव्हेंबर 2024 रोजी दिवाळीनिमित्त मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन केले जाईल. मुहूर्ताच्या व्यवहाराच्या वेळेची माहिती शेअर बाजार नंतर देईल. दरवर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग होते, ज्यामध्ये संध्याकाळी एक तास शेअर बाजार उघडतो. गुंतवणूकदार या काळात बाजारात पैसे गुंतवणे खूप शुभ मानतात.