मुंबई – अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल हे दोघे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध कपलपैकी एक आहे. इष्क चित्रपटनिमित्त दोघेही एकत्र आले आणि चांगले मित्र बनले. पुढे थोड्याच दिवसात मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न केलं. ही स्टोरी सर्वांनाच माहिती आहे. परंतु लग्नानंतर देखील त्यांचं प्रेम तेवढाच आहे हे नुकतच व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओवरून समजते. या व्हिडिओमध्ये काजोलने अजयला अनेक अपशब्द वापरल्याचे पाहायला मिळते.
अजय-काजोजचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी अजय आणि काजोल करण जोहरच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अजयला तुला काजोलसोबत कोणाला काम करताना पाहायला आवडेल असा सवाल विचारला. त्यावर अजय म्हणाला,सहकलाकार म्हणून कि मुलगा म्हणून. यावर शेजारी बसलेली काजोल चांगलीच भडकली. ‘चप्पल काढून मारेन’ असं म्हणत काजोलने अजयला अपशब्द देखील वापरले.
अजय काजोलची शाब्दिक जुलगबंदी यानिमित्ताने दिसून आली. अजय मात्र यावेळी काजोलला कोणत्याच प्रकारे भाव देत नव्हता. एवढेच काय पण करणच्या प्रत्येक प्रश्नावर तो काजोलला चिडवताना दिसत होता.
View this post on Instagram
नेटकऱ्यांना या कपल्सचं व्हिडीओ चांगलाच आवडला आहे. म्हणूनच जुना असूनही हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. अजय देवगनाला आपल्या पत्निची शाब्दिक खेचाखेची करताना पाहून नेटकऱ्यांना मात्र हे आजही पाहिल्यासारखेच रोमँटिक असल्यासारखे वाटत आहे. म्हणूनच हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.