MP Election 2023 : मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. या निवडणुकीत 2,533 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. यावेळी, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या राजकीय भवितव्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार असतानाच, कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यासारख्या दिग्गज काँग्रेस नेत्यांचे राजकीय भवितव्यही पणाला लागले आहे.
#WATCH | On CM’s face, Union Minister and BJP leader Jypotiraditya Scindia says “I have always said that I am not in the race for the Chief Minister. I was never in the race, neither in 2013, 2018 or 2023. The race is for the development and growth of PM. ‘Kursi ka race Congress… pic.twitter.com/yxFG5KWS4l
— ANI (@ANI) November 17, 2023
राज्यात 5.6 कोटीहून अधिक मतदार नोंदणीकृत आहेत. अनुसूचित जमातीसाठी 47 जागा आणि अनुसूचित जातीसाठी 35 जागा राखीव असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागामुळे बालाघाट जिल्ह्यातील बैहार, लांजी आणि परसवाडा येथील 55 मतदान केंद्र, मांडला जिल्ह्यातील बिचिया आणि मांडला मतदारसंघ आणि दिंडोरी जिल्ह्यातील 40 मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेतच मतदान होणार आहे.
दरम्यान, भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मतदान केले. मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसमध्ये खुर्चीची शर्यत सुरू आहे. ही विकासाची आणि प्रगतीची घोडदौड आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भाष्य करताना ज्योतिरादित्य सिंधिया पुढे म्हणाले की, ‘ही खुर्चीची शर्यत नाही. ही शर्यत विकास, प्रगती आणि जनतेचा विश्वास सुनिश्चित करण्यासाठी आहे. यादरम्यान सिंधिया यांनी काँग्रेस पक्षावरही हल्लाबोल करत मुख्यमंत्रीपदाची शर्यत काँग्रेसमध्ये असल्याचे सांगितले.’