ज्योतिरादित्य सिंधिया लाखापेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर

मध्य प्रदेश – मध्य प्रदेश काँग्रेसचे जेष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया हे मध्य प्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांना येथून भाजप उमेदवार डॉ. के पी यादव यांचे तगडे आव्हान आहे. दरम्यान, गुना मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया हे भाजप उमेदवार डॉ. के पी यादव यांच्या बरेच मागे पडल्याचं चित्र दिसत आहे.

आताच हाती आलेल्या आकडेवारीनुसार ज्योतिरादित्य सिंधिया यांना ४७३,८३७ एवढी मतं मिळाली असून त्यांच्याविरोधात भाजप उमेदवार डॉ. के पी यादव यांना ५९८,११४ एवढी मतं मिळाली आहेत.

दरम्यान, मध्य प्रदेशातील गुना हा लोकसभा मतदारसंघ ज्योतिरादित्य सिंधिया यांचा गड मानला जात असून ते येथील विद्यमान खासदार देखील आहेत. २०१४मध्ये मोदी लाटेच्या वेळी देखील गुना येथील जनतेने त्यांना लोकसभेवर पाठवलं होतं मात्र यंदा आतापर्यंतच्या आकडेवारीमध्ये ते पिछाडीवर पडताना दिसत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.