मुंबई : कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायाधीश, दीपांकर दत्ता यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. मांगवारी सायंकाळी त्यांनी राजभवनात शपत देण्यात आली. भगत सिंह कोश्यारी यांनी न्या. दीपांकर दत्ता यांना पदाची शपथ दिली. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी न्या. दीपांकर दत्ता यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखविली.
त्यानंतर राज्यपालांनी न्या. दत्ता यांना शपथ दिली.यावेळी लॉकडाऊनच्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले,विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, न्या. दत्ता यांचे कुटुंबीय, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय कुमार, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
न्या. दीपांकर दत्ता यांनी १६ नोव्हेंबर १९८९ रोजी वकिलीला सुरुवात केली होती. त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालय, गुवाहाटी उच्च न्यायालय, झारखंड उच्च न्यायालय तसेच काही वेळा सर्वोच्च न्यायालयात काम पाहिले आहे. २२ जून २००६ रोजी कोलकाता उच्च न्यायालयामध्ये त्यांची कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.