मुंबई – साऊथची सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिच्या मॅनेजरने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रश्मिका मंदान्ना या मॅनेजरसोबत तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांपासून काम करत होता, ज्याने तिची फसवणूक केल्याचे सांगण्यात येत आहे.
मिशन मजनू फेम रश्मीकासोबत 80 लाख रुपयांच्या फसवणुक झाली आहे. रश्मिका मंदान्नाच्या मॅनेजरचे नाव अद्याप समोर आलेले नाही, परंतु असे वृत्त आहे की तो तिच्या करिअरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तिच्यासोबत काम करत होता. रश्मिका मंदान्नाने मोठी रक्कम उकळल्यानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकले. हा घोटाळा रश्मिका मंदान्नाच्या लक्षात येताच तिने क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ कारवाई केली.
तिने मॅनेजरला कामावरून काढून टाकले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिकानेअत्यंत शांततेत आणि खाजगी पद्धतीने हे प्रकरण हाताळण्याचा निर्णय घेतला. 80 लाखांची फसवणूक करणाऱ्या या मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकत हे प्रकरण बंद केले आहे. तिला या प्रकरणात कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ द्यायची नव्हती.
प्रोफेशनल वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, ‘पुष्पा’, ‘गुडबाय’ आणि ‘सीथा रामम’ या चित्रपटांनंतर बॉलिवूडमध्ये जबरदस्त लोकप्रियता मिळाली. रश्मिका लवकरच रणबीर कपूर स्टारर ‘अॅनिमल’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर रिलीज झाला असून चाहते आता ट्रेलरची वाट पाहत आहेत.