पुणे (प्रतिनिधी) – पुण्यातील साधू वासवानी मिशन मेडिकल कॉम्प्लेक्स येथील इनलॅक्स व बुधानी रुग्णालयातुन करोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या दोन रूग्णांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी केलेले उपचार व घेतलेली काळजी आणि 14 दिवसाचा विलगीकरण कालावधी पूर्ण केल्यानंतर या दोन्ही रुग्णांनी विषाणूच्या संसर्गावर मात केली आणि त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. या दोन्ही करोनामुक्त रुग्णांना हॉस्पिटलमधुन सोडल्यानंतर रुग्णालयच्या संपुर्ण स्टाफने टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छा देवुन निरोप दिला.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1200113826994987/