आळंदी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग यांनी मंदिरास भेट देऊन सपत्नीक माऊलींचे दर्शन घेतले. तसेच देवस्थानच्या विकास कामांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
यावेळी पुणे विभाग सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील, मंदिराचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर उपस्थित होते.
देवस्थानच्या वतीने अँड. ढगे पाटील यांच्या हस्ते न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग, सुधीरकुमार बुक्के यांचा शाल, श्रीफळ, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा व माऊलींची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.