“शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका….”

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

न्यूयॉर्क : जगात एकीकडे कोरोनाने हैदोस घातला आहे तसेच करोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. एकीकडे अनेक देशांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला असताना काही देश मात्र पुन्हा शाळा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. याच निर्णयावर जागतिक आरोग्य संघटनेने करोनाची परिस्थिती अजून गंभीर होईल अशी भीती व्यक्त केली आहे. तसेच शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका असा इशाराच दिला आहे. इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी शाळा सुरु करण्यासाठी घाई केली जाऊ नये असा सल्ला दिला आहे. तसेच शाळांना राजकारणात आणू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. एकदा करोना महामारीचा प्रभाव कमी झाला की सुरक्षितपणे शाळा सुरु केल्या जाव्यात असे त्यांनी म्हणते आहे. माइक रायन यांनी यावेळी अमेरिकेसारख्या देशांमध्ये मर्यादित किंवा भौगोलिक लॉकडाउन केला जावा असा सल्ला दिला आहे. जेणेकरुन परिस्थिती हाताबाहेर गेलेल्या काही ठराविक भागांमधील संसर्ग रोखण्यात यश मिळेल.

करोनामुळे जगभरात निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नसताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी परिस्थिती अजून गंभीर होईल असा इशारा दिला आहे. जर देशांनी आरोग्याशी संबंधित पूर्वकाळजी घेतली नाही तर तर महामारी अजून गंभीर रुप धारण करेल अशी भीती टेड्रोस यांनी व्यक्त केली असून इशाराही दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.