नवाब मलिक यांच्या विरोधातील ‘त्या’ याचिकेवर 22 नोव्हेंबरला निकाल

मुंबई  – अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल मानहानीच्या खटल्याचा निकाल 22 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. या प्रकरणी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणी न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी सुनावणी झाली. नवाब मलिक आणि ज्ञानदेव वानखेडे दोघांकडूनंही अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. ही विनंती न्यायालयाने मान्य केली आहे.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला, दाखल्याचा फॉर्म आणि नाव बदलल्याचा दाखला न्यायालयात सादर केला. तर ज्ञानदेव वानखेडे यांनी आपले जातीचे प्रमाणपत्र आणि समीर वानखेडेंचा जन्म दाखला कोर्टात सादर केला. अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वी ही कागदपत्र दोन्ही बाजूंनी दाखल झाल्यामुळे सोमवारी हायकोर्ट काय निकाल देणार याची उत्सुकता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.