मुंबई – मुंबईत 2 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक पार पडणार आहे. ही बैठक संध्याकाळी 7.30 वाजता असणार आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक चर्चगेट येथील एमसीए लॉंग येथे पार पडणार आहे.
या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, समाजवादी पार्टीचे अबू आझमी,शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, विधानपरिषदेचे सदस्य शिवसेना आमदार अनिल परब, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती या बैठकीचे संयोजक व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.