लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वाहतूक सेनेचे अध्यक्ष अनिल कडू यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत आपल्या हातात शिवबंधन बांधून घेतले. सोबतच यावेळी अनेक तरुण आणि युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करीत पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्धार केला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मावळ लोकसभा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थितांना शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, पुणे जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, मावळ तालुका संपर्कप्रमुख प्रभाकर पवार यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा सहसंपर्क संघटिका शादान चौधरी, पुणे जिल्हा महिला आघाडी संघटीका शैला खंडागळे, युवासेना पुणे जिल्हा अधिकारी अनिकेत घुले, तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, तालुका सल्लागार प्रमुख मारूती खोले, समन्वयक जयवंत दळवी, महिला आघाडी शहर संघटिका कल्पना आखाडे, युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी आदी उपस्थित होते.