मुंबई – बॉलीवूड किंग ‘शाहरुख खान’ अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. शाहरुख खान 2023 मध्ये त्याच्या तीन चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. दिवाळीत शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरला अभिनेत्याने त्याच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. तेव्हा पासून त्याचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, अभिनेत्या जेव्हा पठाण चित्रपटाचा टिझर शेअर केला होता, तेव्हा पासूनच चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. अश्यातच, पुन्हा एकदा अभिनेता शाहरुख खान याने आपल्या चाहत्यांना खुश केलं आहे. नुकतंच, शाहरुखने जॉन अब्राहमच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त पठाण चित्रपटातील जॉनचा नवा लूक शेअर केला आहे.
आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शाहरुखने हा फोटो शेअर केला आहे. हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सिनेरसिकांना हा चित्रपट चार भाषांमध्ये पाहता येणार आहे. पठाण हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे. दरम्यान, जॉनचा हा फोटो पाहून दोघांचेही चाहते प्रचंड आनंदित झाले आहेत.
View this post on Instagram
या फोटोमध्ये जॉनच्या हातामध्ये बंदूक दिसत असून तो कोणत्याही क्षणी लक्ष्याचा वेध घेण्याच्या तयारीत दिसत आहे. जॉनचा हा फोटो शेअर करत शाहरुखनं लिहिलं आहे की, ‘ऑनस्क्रिन शत्रू, ऑफस्क्रिन मित्र… वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा… ” असं पोस्ट त्याने शेअर केली आहे. पठाण चित्रपटात दीपिका पादुकोण ,शाहरुख खान, जॉन अब्राहम दिसणार असून हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज करण्यात आले आहे.